ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचारांची आवश्यकता आहे अश्या वस्त्यांमध्ये संस्थेच्या माध्यमातून एक दिवसीय-दोनदिवसीय प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. सध्या तीन ठिकाणी साप्ताहिक दवाखाने नियमितपणे सुरु आहेत.
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान व सेवा आरोग्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत साप्ताहिक दवाखाना :
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान व सेवा आरोग्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड भागात तीन वस्त्यांमध्ये नियमितपणे साप्ताहिक दवाखाने सुरू आहेत. वस्तीमधील नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी. त्यांना आरोग्याच्या सोई-सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सिंहगड रोड भागातील अण्णाभाऊ साठे वस्ती, जाधव नगर – गोसावी वस्ती आणि समर्थ नगर अशा तीन वस्त्यांमध्ये साप्ताहिक दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. हे दवाखाने वस्त्यांमध्ये आठवड्यातून एक दिवस तीन तास चालविले जातात. दवाखान्यामध्ये येणार्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्या आजारानुसार गोळ्या – औषधे दिल्या जातात. योग्य ते मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येते आणि प्रत्येक पेशंटचा नियमित पाठपुरावा केला जातो. तसेच वस्तीतील सर्व नागरिकांच्या गृहभेटी घेतल्या जातात. या भेटीमध्ये नागरिकांना साप्ताहिक दवाखान्याविषयी माहिती देण्यात येते. तसेच आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी त्यांना दवाखान्यात येण्याचे सांगण्यात येते.