IMG_20190623_152228
IMG-20191101-WA0002
IMG-20191101-WA0000
previous arrow
next arrow

वस्ती विभागातील नागरिकांच्या आरोग्यातील गरजा लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून वस्त्यांमध्ये नियमित आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. सद्य स्थितीत ३ वस्त्यांमध्ये साप्ताहिक दवाखाने नियमितपणे सुरु आहेत. या दवाखान्यामध्ये नाममात्र शुल्क घेऊन रुग्ण तपासणी, समुपदेशन आणि औषधे दिली जातात. दवाखान्या नंतर संस्थेच्या आरोग्यमैत्रिणी नियमित पाठपुरावा करतात. अवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचारांसाठी सलंग्न रुग्ण्यालयात पाठवले जाते. आतापर्यंत १२०० पेक्षा जास्त लोकांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला आहे