About Organization

२०१० साली पुण्यातील सिंहगड रोड येथील काही समविचारी मंडळी एकत्र आली. ‘आपण राहतो त्या भागात काही सामाजिक, विधायक उपक्रम सुरु करू या’ हा साधा सरळ विचार या सुजनशक्तीने केला आणि ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला माध्यमातून सुरु झालेला प्रवास, गंमत शिबीर ,कौतुक सोहळा, त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने कौटुंबिक दीप संध्या अशी वळणे घेत पुणे शहरातील अनेक वस्त्यांमधून संस्कार, शिक्षण, आरोग्य, किशोर- किशोरी विकास , महिला सक्षमीकरण अशा प्रकल्पाच्या माध्यमातून स्थायी कार्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

ध्येय

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानमधील आमची दृष्टी म्हणजे समाजातील विविध घटकांमधील सामाजिक विषमतेची दरी मिटविण्यासाठी शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करणे व अंमलबजावणी करणे.  समाजातील आर्थिकदृष्ट्या तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित समुहासाठी त्याच्या वैयक्तिक तसेच सामुहिक उत्कर्षासाठी विविध  कार्यक्रमांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देणे. या साठी आवश्यक असे साधन साहित्य उपलब्ध करुन विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी अखंड प्रयत्न करत राहणे

धोरण

  • ३ ते १२ या वयोगटातील मुलांच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी समृद्धी वर्ग सुरु केले आहेत. आमचा विश्वास आहे कि मुलांमध्ये वर्तन, सवय, सभोवतालचे वातावरण, शैक्षणिक कौशल्य या मध्ये सकारात्मक बदल घडून येण्यासाठी हेच योग्य वय आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना अत्यंत चिकाटीने आणि सातत्यपूर्ण पद्धतीने प्रयत्न करत राहणे.
  • किशोरदर्पण प्रकल्पाच्या माध्यमातून तज्ञ व अनुभवी समुपदेशक, मार्गदर्शक यांच्या मदतीने किशोरवयीन मुलां-मुलींना सकारात्मक दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत राहणे.
  • समाजातील विषमतेची दरी मिटवण्यासाठी आणि समाज समरस होण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, मेळावे, एकत्रीकरण आयोजित करणे आणि या द्वारे सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणे.

ढील काळात महिला रोजगार, संस्कार वर्ग, अभ्यासिका, अशा प्रकारच्या विविध विषयांमध्ये आपल्याला काम करावयाचे आहे. त्या साठी आपल्याला अनेक कार्यकर्त्यांची आवश्यकता आहेच. अश्या वेळ देवू इच्छिणाऱ्या व्यक्ती या कार्याशी जोडल्या जाऊ शकतात. कार्यकर्त्यान बरोबरच या सर्व उपक्रमांसाठी व प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी निधीची गरज असते हे आपण जाणताच. आपण या कार्यासाठी निधी देवून हातभार लावु शकता. त्याद्वारे आपण आपले प्रकल्प सुरु ठेवू व त्यामध्ये वाढ करून समाजात चांगले बदल घडवूयात.
आमची बँक –
जनसेवा सहकारी बँक लि. माणिकबाग शाखा
SWANAND JANKALYAN PRATISHTHAN
IFSC : JANA0000013
A/C No- 13023016514